बुद्धिबळाचा खेळ हा त्याच्या नावाप्रमाणे बुद्धिवंतांचा खेळ समजला जातो. या खेळाच्या प्रत्येक खेळीनंतर अनेक शक्यता निर्माण होतात आणि त्यामुळे हा खेळ बुद्धिचातुर्याच्या आणि तंत्रकौशल्याच्या बळावरच जिंकता येतो. जेव्हा यंत्रांना माणसासारखी बुद्धिमत्ता देण्याचा विचार झाला तेव्हापासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात यंत्राने मानवाला बुद्धिबळात हरवणे हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा टप्पा मानला गेला.

यंत्राने बुद्धिबळ खेळण्याचा पहिला प्रयत्न हा संगणकाचा शोध लागण्याआधी केला गेला. अॅलन टुरिंग या गणितज्ञ आणि संगणकतज्ज्ञाने याचा अल्गोरिदम लिहिण्याची सुरुवात १९४८ साली, म्हणजे पहिला संगणक बनण्याआधी केलेली होती. १९५० साली याची आज्ञावली त्याने पूर्ण केली आणि त्याला ‘टुरोचॅम्प’ हे नाव दिले गेले. १९५२ साली त्याने ‘फेरांटी मार्क १’ या संगणकावर तो चालवायचा प्रयत्न केला पण त्या संगणकाची गणनक्षमता त्यासाठी कमी पडली. हा ‘टुरोचॅम्प’ न चुकता बुद्धिबळ खेळू शकायचा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence and chess amy
First published on: 13-05-2024 at 05:52 IST