कृत्रिम धागा तयार करण्यासाठी प्रथम नसíगक धाग्यांच्या रेणूंच्या रचनेचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यात त्यांना एकरेषीय बहुवारिक (लिनीअर पॉलिमर)  असल्याचे आढळून आले. कापूस, ताग यांसारख्या वनस्पतीजन्य तंतूत सेल्युलोज हे बहुवारिक असते तर लोकर, रेशीम यांसारख्या प्राणीजन्य तंतूत हे बहुवारिक प्रथिनांच्या स्वरूपात असते. तंतूतील हे एकरेषीय बहुवारिक रेणूंच्या प्रचंड मोठय़ा  साखळीच्या स्वरूपात असते (लाँग चेन लिनीअर पॉलिमर). म्हणजेच तंतू बनविण्यासाठी मोठय़ा साखळीच्या स्वरूपातील एकरेषीय बहुवारिकाची गरज असते असा निष्कर्ष निघाला. एकरेषीय बहुवारिकामध्ये मूळ रेणूंच्या साखळीचा विस्तार एकाच दिशेने होतो. आता कृत्रिम तंतू बनविण्यासाठी अशा प्रकारचे बहुवारिक मिळविण्याचे दोन पर्याय शास्त्रज्ञांपुढे उपलब्ध होते.
 पहिला मार्ग- निसर्गात सेल्युलोज किंवा प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. फक्त फरक इतकाच की तंतूंमधील बहुवारिक हे एकरेषीय असते आणि इतर पदार्थात हेच बहुवारिक दुसऱ्या स्वरूपात म्हणजे दोन दिशांत विस्तारलेल्या पातळ पापुद्राच्या स्वरूपात (उदा. झाडांच्या पानांमधील सेल्युलोज) किंवा तीन दिशांना विस्तारलेल्या घनपदार्थाच्या स्वरूपात (उदा. झाडांच्या खोडातील सेल्युलोज) आढळतात. अशाप्रकारचे बहुवारिक मिळवून त्याचे एकरेषीय बहुवारिकामध्ये रूपांतर करणे हा कृत्रिम तंतू बनविण्याचा पहिला व सोपा मार्ग. इतिहासातील पहिले कृत्रिम तंतू याच मार्गाने तयार करण्यात आले. अशा तंतूंना नसíगक बहुवारिकीय तंतू किंवा पुनíनर्मित तंतू असे संबोधण्यात येते. अशा प्रकारचे तंतू तयार करण्याचे प्रयोग प्रथमत: १८८०च्या सुमारास सुरू झाले, पण खऱ्या अर्थाने त्यांचे व्यापारी पद्धतीने उत्पादन १९१० मध्ये सुरू झाले आणि या पहिल्या तंतूचे नाव ‘व्हीस्कोज’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर अनेक प्रकारचे पुनíनर्मित तंतू बाजारामध्ये आले.
 दुसरा मार्ग- पुनíनर्मित तंतूंचे गुणधर्म हे नसíगक तंतूंच्या मानाने खूपच कमी दर्जाचे असल्याने असे तंतू फार लोकप्रिय होऊ शकले नाहीत. त्यामुळे शास्त्रज्ञांनी मूळ रेणू तसेच त्यांचे एकरेषीय बहुवारिक हे प्रयोगशाळेतच तयार करून त्यापासून तंतू बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ही प्रक्रिया अत्यंत अवघड असल्याने यश मिळण्यासाठी मोठा कालावधी जावा लागला.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संस्थानांची बखर – दतिया राज्य स्थापना
मध्यप्रदेशातील झाशी शहरापासून ३४ कि.मी.वर असलेल्या दतिया शहराचा उल्लेख महाभारतात ‘दैत्यवक्र’ असा आढळतो. सध्या दतियामध्ये धान्य आणि कापसाची मोठी बाजारपेठ असून हातमाग वस्त्रोद्योगाचे प्रसिद्ध केंद्र आहे. मध्य प्रदेशातल्या बुंदेला राजपूत घराण्याच्या लोकांनी स्वतची राज्ये स्थापन केली. त्यापकी दतिया हे महत्त्वाचे समजले जाते.
ओच्र्छाचे महाराजा वीरसिंग देव (सोबतचे चित्र पाहा) यांनी त्यांचा कनिष्ठ पुत्र राव भगवान राव याला दतिया आणि बरोनीचे परगणे भेट दिल्यावर भगवान रावने १६२६ मध्ये दतिया या शहरात राजधानी ठेवून आपले राज्य स्थापन केले. एकोणिसाव्या शतकात दतिया राज्याचे क्षेत्र ५५०० चौ.कि.मी. आणि लोकसंख्या पावणे दोन लाख अशी होती. सालीना चार लाख रुपयांचे महसुली उत्पन्न देणाऱ्या या राज्यात १३८ गावे अंतर्भूत होती. ब्रिटिश राजवटीने दतियाला १७ तोफ सलामींचा बहुमान दिला होता.
ओच्र्छा राज्यकर्ता वीरसिंग देव याचा मुघल बादशहा जहांगीराशी विशेष स्नेह होता. जहांगीराला त्याच्या वारसा हक्क-संघर्षांत वीरसिंग देव, त्याची मुले म्हणजेच भावी दतिया राजे भगवान राव आणि शुभकरण यांनी मदत केली होती. त्याची आठवण ठेवून जहांगीराने दतिया राज्य स्थापनेच्या वेळी त्यांना अनेक गावे इनाम दिली. या इनाम मिळालेल्या प्रदेशांमुळे दतिया राज्याचा विस्तार उत्तरेस चंबळ नदी, पूर्वेस बेटवा तर पश्चिमेस सिंधपर्यंत पोहोचला. दतिया, खानियाधना ही राज्ये ओच्र्छा राज्यकर्त्यांना पालकत्वाचा, विश् वस्ताचा मान देत असत.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man made thread