-यास्मिन शेख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी गणेशचतुर्थीच्या दोन दिवस आधी गणपतीची मूर्ती विकत घ्यायला गेलो. त्या दुकानात इतक्या विविध प्रकारच्या मूर्त्यां होत्या की, त्यांतली कोणती मूर्ती घ्यावी हेच मला कळेना.’

ही वाक्ये वाचल्यावर वाचकांच्या लक्षात चूक आली असेल. ती चूक म्हणजे- ‘मूर्त्यां’ या शब्दाची. मूर्ती (संस्कृत शब्द मूर्ति), मराठीत हा शब्द मूर्ती- र्ती- दीर्घ ईकारान्त असा स्वीकारलेला आहे. हा शब्द तत्सम शब्द होय. तत्सम शब्द याचा अर्थ संस्कृतातील काहीही बदल न करता मराठी भाषेने स्वीकारलेला शब्द. मात्र संस्कृतातील ऱ्हस्व इकारान्त किंवा ऱ्हस्व उकारान्त असलेले शब्द मराठीत दीर्घ ईकारान्त, दीर्घ ऊकारान्त लिहितात. हा लहानसा फरक असला, तरी त्या शब्दांना तत्सम शब्द म्हटले जाते. उदा. व्यक्ती (सं. व्यक्ति), मती (सं. मति), रीती  इ.

महत्त्वाचे म्हणजे हे शब्द जेव्हा समासात पूर्वपदी येतात, तेव्हा ते ऱ्हस्व (संस्कृत शब्दांप्रमाणे) लिहितात. उदा. प्रीति (सं)- मराठी प्रीती- समास (संस्कृताप्रमाणे) प्रीतिविवाह,

मति (सं) मराठी-मती-समास-मतिमंद, ऋतु (सं.) मराठी- ऋतू-समास (संस्कृताप्रमाणे) ऋतुकाल इ.

वरील वाक्यांत मूर्ती हा तत्सम शब्द आहे. संस्कृतात मूर्ति-मराठी मूर्ती-सामासिक शब्द संस्कृताप्रमाणे-मूर्तिरूप, (पति, (सं.) पती- (म)मराठी सामासिक शब्द संस्कृताप्रमाणे- पतिपत्नी.) ‘मूर्ती’ या शब्दाचे अनेकवचन ‘मूर्र्त्यां’ होत नाही. मूर्तीचे अनेकवचन मूर्ती होते. फक्त क्रियापद जर मूर्ती या अनेकवचनी शब्दासाठी असेल तर ते अनेकवचनी होते. जसे- ‘गणपतीच्या विविध प्रकारच्या मूर्ती होत्या’ या वाक्यात विविध प्रकारच्या हे अनेकवचनी रूप (अनेक मूतऱ्ींच्या संदर्भात) होते. जसे – एक प्रकारची मूर्ती – अनेक प्रकारच्या मूर्ती.

या ठिकाणी प्रसिद्ध लेखक पु.ल.देशपांडे यांच्या ‘एक शून्य मी’ या पुस्तकातील ‘धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही, आम्ही..’ या लेखातील ही वाक्ये उद्धृत करावीशी वाटतात. ‘शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.’ असेच काही शब्द वरच्या चौकटीत दिलेले आहेत.

संस्कृत शब्द     मराठीतील तत्सम शब्द       एकवचन – अनेकवचन

समाधि             समाधी                    समाधी

त्रुटि                त्रुटी                        त्रुटी

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Word accepted in marathi language marathi compound words marathi language zws