-
'सरबजीत'च्या प्रीमियरवेळी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात दुरावा दिसून आल्याने दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते.
-
बॉलीवूडमध्ये सध्या ब्रेकअपचा सिलसिला सुरू असताना आता ऐश्वर्या आणि अभिषेक देखील वेगळे होणार की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
-
पण मंगळवारी रात्री या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.
-
मंगळवारी रात्री अभिषेक ऐश्वर्याला लाँग ड्राईव्हसाठी घेऊन गेला होता. यावेळी छायाचित्रकरांनी या दोघांना कॅमेरात कैद केले.
-
दोघांनीही मंगळवारी रात्री नाऊटआऊटची मजा लुटली आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला.
-
अभिषेक-ऐश्वर्याच्या या लाँग ड्राईव्हमुळे दोघांचे बिनसले असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
ऐश्वर्याला घेऊन अभिषेकची ‘लाँग ड्राईव्ह’…
Web Title: Aishwarya rai and abhishek bachchan long drive