-
मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांचं नाव टॉपला आहे.
-
कर्करोगासारख्या आजारावर यशस्वीरित्या मात करत शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमध्ये ते सध्या काम करत आहेत.
-
शरद पोंक्षे सोशल मीडियावरही फार सक्रिय आहेत.
-
नेहमीच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
यादरम्यानचे काही फोटो आणि खास पोस्ट त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे.
-
ही पोस्ट शेअर करताना त्यांनी म्हटलं की, आज रत्नागिरीत ‘फाळणीच्या वेदना’ हा लेख संग्रह माझ्या हस्ते प्रकाशित झाला व फाळणी ह्या विषयावर व्याख्यान झालं.पाऊस असूनही सभागृह पूर्ण भरलं होतं. रसिकांना धन्यवाद.”
-
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सभागृहामधील गर्दी स्पष्टपणे दिसून येत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : “पाऊस असूनही सभागृह पूर्ण भरलं होतं आणि…” शरद पोंक्षे यांनी शेअर केले रत्नागिरी येथील कार्यक्रमाचे काही खास फोटो
अभिनेते शरद पोंक्षे यांनी रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली होती. त्यांनी यादरम्यानचे काही खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
Web Title: Actor sharad ponkshe share photo from ratnagiri programme and write special post see details kmd