-
हिना खान
अभिनेत्री हिना खान लोकप्रिय टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील ‘अक्षरा’ या भूमिकेसाठी लोकप्रिय आहे. या मालिकेत तिने पारंपारिक भारतीय महिलेची भुमिका साकारली होती. ऑफ स्क्रीन हिना खान तिच्या ग्लॅमरस आणि ट्रेंडी लुकने सर्वांना प्रभावित करते. -
देवोलिना भट्टाचार्जी
देवोलिना भट्टाचार्यला तिच्या ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. देवोलीनाने बिग बॉसच्या घरात वारंवार प्रवेश केला आहे. -
देवोलिना खरोखरच एक स्टायलिश अभिनेत्री आहे. तिच्या फॅशन सेन्स अतिशय उत्तम असून साडी ते इंडो-वेस्टर्न लुकपर्यंत ती सर्वच पेहराव अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते.
-
दिव्यांका त्रिपाठी
दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय टीव्ही शो ‘ये है मोहब्बतें’ मधून प्रसिद्ध झाली. तिची इंस्टाग्राम प्रोफाइल तिच्या सुपर स्टायलिश अंदाजाचा पुरावा आहे. दिव्यांका त्रिपाठी वारंवार नवीनतम फॅशन ट्रेंड आणि तिच्या दैनंदिन शैलीचे फोटो शेअर करते. -
जस्मिन भसीन
जास्मिन भसीन ही टीव्हीवरील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. ती खऱ्या अर्थाने स्टाईल आयकॉन आहे. ती प्रत्येक शैली सहजतेने आणि आत्मविश्वासाने स्वीकारते. -
रुबिना दिलैक
बिग बॉस 14 ची विजेती म्हणून ओळखली जाणारी रुबिना दिलैक घराघरात प्रसिद्ध आहे. टीव्ही शोमध्ये त्याने साकारलेल्या पात्रांमुळे लोक तिला ओळखतात. तिने काही पारंपारिक भूमिकाही साकारल्या आहेत. -
तिच्या भूमिकांप्रमाणेच तिचा फॅशन सेन्सही अतिशय अनोखा आणि ट्रेंडी आहे. नवीन फॅशन लुक्स ट्राय करायला ती अजिबात घाबरत नाही.
-
कृतिका कामरा
कृतिका कामरा गेल्या काही काळापासून मुख्य प्रवाहातील टीव्ही शोपासून दूर आहे. ती गेल्या वर्षी तांडवमध्ये दिसली होती. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. -
फ्लर्टी फेमिनिन लुकपासून ते एथलीजर लुकपर्यंत कृतिका कामरा प्रत्येक लुक स्टाईल करते.
-
सुरभी ज्योती
सुरभी ज्योतीने झी टीव्हीच्या सुपरहिट शो ‘कुबूल है’मधून ‘झोया फारुकी’ म्हणून पदार्पण केले. तिने नागिनची भूमिकाही केली आहे. -
ती खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे. सेन्सुअल लूकपासून ते एथनिक लूकपर्यंत प्रत्येक फॅशन लुकमध्ये ती सुंदर दिसते.
-
अनिता हसनंदानी
अनिता हसनंदानी ही अतिशय प्रतिभावान अभिनेत्री आहे. त्यांनी विविध प्रादेशिक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय, ती तिच्या एथनिक पोशाखांच्या शैलीसाठी ओळखली जाते. -
श्वेता तिवारी
श्वेता तिवारी बिग बॉस सीझन 4 ची विजेती आहे. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ग्लॅमरस ते पारंपारिक, श्वेता तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
Photos: हिना खान ते श्वेता तिवारी; ‘या’ आहेत देशातील सर्वांत स्टायलिश टीव्ही अभिनेत्री
‘या’ आहेत देशातील सर्वांत स्टायलिश टीव्ही अभिनेत्री
Web Title: Top 10 most stylish hindi television actress ieghd import pvp