-
साऊथ सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना खलनायकच्या प्रसिद्ध भूमिकांमुळे ओळखले जाते. या स्टार्सनी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना खूप घाबरवले. चला जाणून घेऊया कोण आहेत साऊथ सिनेमातील टॉप ७ खलनायक कलाकार. (zee5)
-
जगपती बाबू
जगपती बाबू हा साऊथ सिनेमातील एक भयानक खलनायक आहे. ‘रंगस्थलम’ या चित्रपटातील जगपती बाबूची भूमिका खूपच भीतीदायक होती. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये त्याने खलनायक बनून प्रेक्षकांना घाबरवले आहे. (@जग्गुभाई/एफबी) -
एम. नस्सर
साऊथ सिनेसृष्टीतील दमदार अभिनेते आणि नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले एम. नस्सर ‘बाहुबली’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात त्यांनी ‘बिज्जलदेव’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. नस्सर यांनी दक्षिणेतील डझनभर चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Netflix) -
सुनील वर्मा
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सुनील वर्माने आपल्या नकारात्मक भूमिकांमुळे बरीच चर्चा निर्माण केली आहे. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलर फोटो’ या चित्रपटातील त्याच्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्याच वेळी, २०२१ मध्ये रिलीज झाले
ल्या ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटात त्याने सीरियल गँगस्टर मंगलम श्रीनूची भूमिका साकारली होती. त्याच्या खलनायकाच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. (@suniltollywood/Insta) -
राणा दग्गुबती
राणा दग्गुबतीने नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर त्याला संपूर्ण भारतात ओळख मिळाली. एकीकडे ‘बाहुबली’ चित्रपटात प्रभास होता तर दुसरीकडे राणा दग्गुबती नकारात्मक भूमिकेत ‘भल्लालदेव’ झाला होता. याशिवाय राणा नायडू या वेब सीरिजमधील त्याची नकारात्मक भूमिकाही लोकांना आवडली. (@Baahubali/FB) -
संजय दत्त
बॉलिवूडसोबतच संजय दत्त साऊथमध्येही चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘KGF Chapter 2’ मध्ये संजय दत्तची अधीराची भूमिका खूपच धक्कादायक होती. याशिवाय अभिनेता लवकरच ‘डबल ई-स्मार्ट’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. (@संजय दत्त/एफबी) -
रामचंद्र राजू
ज्यांनी साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF Chapter-1’ पाहिला असेल ते गरूणाच्या व्यक्तिरेखेशी परिचित असतील. ही भूमिका रामचंद्र राज यांनी साकारली होती, ज्यांच्या खलनायकी भूमिकेने सर्वांना थक्क केले. (@garuda_ram_official/Insta) -
विजय सेतुपती
विजय सेतुपती सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घालत आहे. विक्रममधील विजय सेतुपतीने साकारलेल्या नकारात्मक व्यक्तिरेखेने तो रातोरात प्रसिद्ध झाला. या चित्रपटात तो ‘संधानम’च्या भूमिकेत होता. त्याची ही भूमिका सर्वात धक्कादायक होती. (zee5)
Photos : साऊथ चित्रपटांमधील ७ सर्वात खतरनाक खलनायक, पडद्यावर पाहून प्रेक्षक झाले हैराण
Iconic Villain Role of South Actors: साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स आहेत जे पडद्यावर नकारात्मक भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. या कलाकारांच्या क्रुर खलनायकाच्या भूमिका पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झालेले.
Web Title: These 7 actors who have played the iconic role of dreaded villain in blockbuster south films spl