-
प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
नुकत्याच पार पडलेल्या मराठी बिग बॉस या कार्यक्रमात सूत्रसंचालन करीत रितेशने प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले.
-
असे म्हटले जाते की, रितेशने केलेल्या सूत्रसंचालन व बिग बॉसमधील ‘भाऊचा धक्का’ या खास सेग्मेंटमुळे यंदाच्या मराठी बिग बॉसने सर्वोत्तम टीआरपी कमावला.
-
अभिनेता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून, प्रेक्षकांशी फोटो ॲण्ड व्हिडीओद्वारे परस्पर संवाद साधत असतो.
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या लूकसाठी रितेशने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
-
सूटमधील या कोटाला पांढऱ्या रंगाच्या छोट्या टिकल्यांनी सजविले आहे.
-
या फोटोशूटमध्ये रितेशने खुर्चीवर बसून बोल्ड पोज दिल्या आहेत.
-
सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टसह रितेशने कॅप्शन देत, ‘In a world of trends, the black suit reigns eternal’ असे म्हटले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रितेश देशमुख / इंस्टाग्राम)
Ritesh Deshmukh Bold Look : रितेश देशमुखचा काळ्या सूटमधील बोल्ड लूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टसह अनोखी कॅप्शन
Web Title: Bollywood star ritesh deshmukh shares is bold look on social media post viral pyd 04