• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. us capitol hill siege vincent xavier palathingal man who waved indian flag at pro trump rally hails from kochi scsg

US Violence: अमेरिकन संसदेसमोर तिरंगा फडकावणारा सापडला; जाणून घ्या नक्की काय आहे त्याचं म्हणणं

ही व्यक्ती कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता, अखेर त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे

Updated: September 9, 2021 00:38 IST
Follow Us
  • जगात प्रगल्भ मानल्या जाणाऱ्या अमेरिकी लोकशाहीवर बुधवारी अध्यक्ष समर्थकांनीच हल्ला केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला.
    1/30

    जगात प्रगल्भ मानल्या जाणाऱ्या अमेरिकी लोकशाहीवर बुधवारी अध्यक्ष समर्थकांनीच हल्ला केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या उद्देशाने मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला.

  • 2/30

    या वेळी हिंसाचाराआधी अमेरिकन संसदेबाहेर जमलेल्या आंदोलकांच्या गर्दीमध्ये भारतीय झेंडाही दिसला. भारतीय झेंडा दिसणार हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा झेंडा नक्की कोणी फडकवला यासंदर्भात तर्क वितर्क लढवले जात असतानाच हा झेंडा तिथे कोण घेऊन गेलं या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.

  • 3/30

    विन्सेंट झेव्हियर पालाथिंगल (Vincent Xavier Palathingal) या भारतीय अमेरिकन व्यक्तीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार त्यानेच अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टन डिसीमधील कॅपिटॉलच्या बाहेर गर्दीमध्ये तिरंगा फडकावला होता.

  • 4/30

    मात्र आपण अमेरिकन संसदेच्या बाहेर तिरंगा फडकवला असला तरी संसदेमध्ये घुसखोरी करुन हिंसाचार घडवणाऱ्यांमध्ये आपण सहभागी नव्हतो असंही विन्सेंट म्हणाले आहेत. मी पूर्णवेळ संसदेच्या इमारतीच्या बाहेरच होतो, असं त्यांनी सांगितलं आहे.

  • 5/30

    अमेरिकन भारतीयांचा ट्रम्प यांना पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठीच आपण त्या आंदोलनामध्ये तिरंगा फडकवला होता, असं विन्सेंट यांनी म्हटलं आहे.

  • 6/30

    भारतीय सोशल नेटवर्किंगवर या आंदोलनामधील अमेरिकन झेंड्यांमधून अचानक तिरंगा फडकतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र विन्सेंट यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही अमेरिक संसदेसमोर झालेल्या आंदोलनात झेंडा फडकवतानाचा फोटो पोस्ट केलाय.

  • 7/30

    विन्सेंट यांनी केवळ भारतीयच नाही तर इतर देशांमधील नागरिकांनाही आपल्या आपल्या देशांचे झेंडे या आंदोलनात आणले होते, असं दाखवण्यासाठी इतर देशातील ट्रम्प समर्थकांचे फोटोही ट्विट केलेत.

  • 8/30

    आपण रिपब्लिकन पक्षाच्या व्हर्जेनिया विभागातील कमिटी सदस्य म्हणून या आंदोलनात सहभागी झाल्याचं विन्सेंट यांनी सांगितलं. आपण या आंदोलनासाठी निघालो तेव्हा सोबत १० भारतीय वंशांचे सहकारी असल्याने मी भारताचा झेंडा आंदोलनात घेऊन गेलो अशी माहितीही विन्सेंट यांनी दिली.

  • 9/30

    व्हिएतनाम, भारतीय, कोरियन, इराणी वंशाचे लोकंही या आंदोलनात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या देशातील आणि वंशाचे लोक जे राष्ट्रभक्त अमेरिकन आहेत ते या आंदोलनात सहभागी झालेले अशी माहिती विन्सेंट यांनी दिली.

  • 10/30

    ज्यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये घोटाळा झालाय असं वाटत होतं त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत आपण आहोत हे दाखवण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असं विन्सेंट सांगतात.

  • 11/30

    मी आंदोलनामध्ये पाकिस्तानी झेंडेही पाहिले. आम्ही सर्वजण शांतपणे आंदोलन करत होतो. शांतपणे आंदोलन करणं आमचा हक्क असल्याचे विन्सेंट यांनी स्पष्ट केलं आहे. 

  • 12/30

    आंदोलन शांततेतच सुरु होतं. मात्र डाव्या विचारसरणीच्या लोकांनी आंदोलनाच्या नावाखाली या गर्दीत घुसखोरी करुन आंदोलनाला गालबोट लावल्याची शंकाही विन्सेंट यांनी बोलून दाखवली.

  • 13/30

    हिंसा करणारे नक्की कोण होते हे आपल्याला अद्याप ठाऊक नाही कारण त्यांची ओळख अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र आमच्या अंदाजानुसार काही समाजकंटक जे प्रामुख्याने विरोधकांनी पेरलेले असण्याची शक्यता आहे. त्यांनीच हा धुडगूस घातल्याची शक्यता आहे, असा दावाही विन्सेंट यांनी केला. 

  • 14/30

    जे लोकं इमारतीच्या भींतीवर अगदी सहजपणे चढले ते चोर आणि गुंडचं होते ते त्यांच्या देहबोलीतून दिसून येत होतं असंही विन्सेंट यांनी सांगितलं.

  • 15/30

    संसदेमध्ये घुसखोरी करणारे लोकं हे रिपब्लिकन पक्षाचे समर्थक होते असं मला वाटतं नाही. मी रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांना चांगल्या पद्धतीने ओळखतो, असंही विन्सेंट यांनी सांगितलं आहे.

  • 16/30

    या बाहेरुन आलेल्या लोकांनी संसदेचे दरवाजे उघडल्यानंतर आंदोलन करणाऱ्या काही रिपब्लिकन समर्थक उत्साहाच्याभरात संसदेमध्ये शिरले असतील हे नाकारता येत नाही, अशी कबुलीही विन्सेंट यांनी दिली.

  • 17/30

    विन्सेंट हे ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाचे मोठे समर्थक आहेत.

  • 18/30

    विन्सेंट यांच्या सांगण्यानुसार, ट्रम्प यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली ही पाचवी रॅली होती ज्यामध्ये वेगवेगळ्या देशांचे लोकं सहभागी झाले होते आणि त्यांनी आपल्या देशांचे झेंडे आणले होते.

  • 19/30

    "पुढाकार घेत संसदेच्या इमारतीमध्ये शिरलेले पहिले ५० जण नंतर गायब झाले. ही हिंसा काही मोजक्या लोकांनी घडवून आणलेली असून हे लोकं लाखो आंदोलकांमध्ये सहभागी होऊन संसदेत शिरले," असा दावाही विन्सेंट यांनी केलाय. 

  • 20/30

    आम्ही संसदेच्या मुख्य दरवाजापासून खूप दूर उभे होतो. जेव्हा आम्ही लोकांना भिंतीवर चढताना पाहिलं तेव्हात काहीतरी गडबड असल्याचं आमच्या लक्षात आलं, असं घडलेल्या प्रसंगाबद्दल बोलताना विन्सेंट म्हणाले. 

  • 21/30

    मी लगेच माझ्या पत्नीला फोन करुन सुखरुप असल्याची माहिती दिली. आम्ही दूर उभे राहून आंदोलन करत होतो. आम्ही शांततेत घोषणा देत होतो. आम्ही मोठ्याने राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाणी गात होतो, असंही विन्सेंट यांनी सांगितलं.

  • 22/30

    विन्सेंट हे ५२ वर्षांचे असून ते आपली पत्नी आशा आणि दोन मुलांसहीत अमेरिकेत राहतात, असं त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन स्पष्ट होतं आहे.

  • 23/30

    विन्सेंट यांचं कुटुंब हे मूळचं केरळमधील कोच्ची जिल्ह्यातील चम्बाकारा येथील आहे.

  • 24/30

    विन्सेंट यांनी तिस्सूरमधील सरकारी इंजिनियरिंग कॉलेजमधून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

  • 25/30

    १९९२ पासून विन्सेंट अमेरिकेमध्येच स्थायिक झाले आहेत.

  • 26/30

    विन्सेंट हे सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रिय आहेत.

  • 27/30

    विन्सेंट यांना राजकारणामध्ये रस असून ते अनेकदा स्थानिक स्तरावरील कार्यक्रमांचे फोटो आणि माहिती पोस्ट करत असतात.

  • 28/30

    मध्यंतरी विन्सेंट भारतामध्येही येऊन गेले. त्यांनीच दिल्लीतील काही फोटो शेअर केले होते.

  • 29/30

    विन्सेंट यांनी आंदोलन झालं असलं तरी त्यामध्ये रिपब्लिकनचे कार्यकर्ते असण्याची शक्यता फेटाळून लावत ही हिंसा कट असल्याकडे इशारा केला आहे.

  • 30/30

    विन्सेंट यांनीच अमेरिकेतील संसदेमध्ये झालेल्या हिंंसाचाराच्या आंदोलनाआधी संसदेबाहेर तिरंगा फडकवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता भारतातील नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. (फोटो Vincent Xavier Palathingal यांच्या ट्विटर आणि फेसबुकवरुन तसेच AP वरुन साभार)

Web Title: Us capitol hill siege vincent xavier palathingal man who waved indian flag at pro trump rally hails from kochi scsg

IndianExpress
  • Canada PM Carney invites PM Modi to attend G7 summit
  • Yunus announces Bangladesh elections in first half of April 2026
  • Over 100 flights a day to be cancelled at Delhi airport for three-month runway upgrade; operator DIAL expects minimal disruption
  • ‘Musk lost his mind’: Day after public fallout, Trump says ‘not particularly’ interested in talking
  • RBI cuts rates again by 50 bps: Borrowers to benefit, savers and depositors to feel the pinch
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us