-
चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असताना १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक प्रकाशित दिसतो. (सर्व फोटो सौजन्य : Reuters)
-
या पौर्णिमेला 'सुपरमून' असे संबोधले जाते. खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड नोएले यांनी १९६९ साली हे नामकरण केले.
-
चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सुमारे ४,०६,६९२ कि. मी. इतके आहे.
-
सुपरमून स्थितीत हे अंतर ३,५८.६१५ कि. मी. इतके असते.
-
अमेरिकेच्या पूर्वेस वसंत ऋतूत फ्लोक्स सबुलाटा नावाचे गुलाबी फूल फुलते. या फुलाच्या रंगासारखा चंद्राचा रंग दिसत असल्यामुळे 'पिंक सुपरमून' संबोधले जाऊ लागले.
-
चैत्र पोर्णिमा आणि हनुमान जयंती दिनीच आकाशात सुपर पिंक मूनचं विलोभनीय दृश्य बघायला मिळालं.
-
पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असताना चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. त्यामुळे चंद्र नेहमीपेक्षा मोठ्या आकारात दिसतो. हे क्वचित दिसणारं दृश्य आज दिसलं. वर्षातील सर्वात मोठ्या आकारातील चंद्राचं रुप खगोलप्रेमींनी डोळ्यात साठवून घेतलं.
-
चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळच्या कक्षेत येतो. तेव्हा चंद्राचा मोठा आकार बघायला मिळतो.
-
पॅरिस शहरातून टिपलेलं चंद्राचं रुप.
-
जर्मनी येथून दिसलेला सुपर पिंक मून.
-
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून टिपलेला सुपर पिंक मून.
-
लंडनमध्ये दिसलेला लाल गुलाबी सुपर मून.
-
टोकिओ येथून दिसलेला सुपर पिंक मून.
-
सुपर पिंक मूनचं सिंगापूरतील नागरिकांना झालेलं दर्शन.
-
विजेच्या प्रकाशानं उजळून निघालेल्या जर्मनी शहरातील इमारती चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्या.
-
आज, बुधवारीही चंद्र अधिक जवळ दिसणार आहे.
नभातील गुलाबी साक्ष… बघा ‘पिंक मून’ विलोभनीय दृश्य
Web Title: Pink supermoon dazzles night sky across the world see beautiful photos of moon sdn