-
बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत.
-
दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.
-
शिवसेना पक्षातर्फे दरवर्षी दसरा मेळावा आयोजित केला जातो. मात्र या वर्षी हे दोन्ही गट आपापला स्वतंत्र दसरा मेळावा घेत आहेत.
-
शिंदे गटाकडून मुंबईतील बीकेसी मैदान तर उद्धव ठाकरे समर्थकांकडून शिवाजी पार्कवर या मेळाव्याचे आयोजन केले जेईल.
-
एकीकडे या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे दोन्ही गटातील नेते आमच्याच बाजूने जनमत असल्याचा दावा करत आहेत.
-
असे असताना आज पोहरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
-
यावेळी महंत सुनील महाराज यांच्यासोबत राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
-
“आज पोहरादेवीची यात्रा आहे. तो मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
-
संपूर्ण राज्यातील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास घडविणे फक्त शिवसेनेलाच शक्य आहे. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे,” असे यावेळी सुनील महाराज म्हणाले.
-
१७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. तेव्हा पूर्ण राज्यात बंजारा समाजातर्फे संकल्प दौरा काढला जाणार आहे, अशी भूमिका यावेळी महंत सुनिल महाराज यांनी मांडली.
-
संजय राठोडांसोबत आम्ही होतो. आता आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत आहोत, असेही सुनिल महाराज म्हणाले.
-
अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत महंत सुनील महाराज हे संजय राठोड यांचे समर्थक मानले जात होते.
-
ठाकरे सरकारच्या काळात संजय राठोडांवर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यावेळी संपूर्ण बंजारा समाज संजय राठोडांच्या पाठिशी असल्याचं संगण्यात आलं होतं.
-
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संजय राठोड पहिल्यांदा यवतमाळमध्ये गेले, तेव्हाही मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं.
-
संजय राठोडांना मोठा पाठिंबा असलेल्या बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनाच शिवसेनेत प्रवेश देऊन उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना शह दिल्याचं बोललं जात आहे.
पोहरादेवीच्या महंतांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न?
बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत.
Web Title: Pohradevi mahant anil maharaj join shivsena sanjay rathod face difficulty prd