-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये गुजरातचे मनसुख मंडावियांना प्रमोशन देण्यात आलं आहे.
-
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये राज्यमंत्री असणाऱ्या मंडावियांना थेट आरोग्यमंत्री पद देण्यात आलं आहे. करोना कालावधीमध्ये हर्ष वर्धन यांच्याकडून सुत्रं हाती घेण्याआधीच मंडाविया चर्चेत आहेत ते त्यांच्या जुन्या ट्विट्समुळे. मंडाविया यांनी मंत्री पदाची शपथ घेताच त्यांचे जुने ट्विट व्हायरल झालेत.
-
मनसुख मंडावियांचे काही जुने इंग्रजी ट्विट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेत. या ट्विटमधील इंग्रजी भाषाचे वापर हा व्यकरणाचे नियम न पाळता करण्यात आल्याने हे ट्विट व्हायरल झालेत. अनेकांनी या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत हे आपले नवे आरोग्यमंत्री आहेत असा टोला लगावलाय. त्यांचे काही व्हायरल झालेले ट्विट पाहुयात.
-
राहुल गांधींना उद्देशून लिहिलेल्या या ट्विटमधील इंग्रजी अनेकांना खटकलीय.
-
महात्मा गांधीजी हे भारताचे राष्ट्रपिता होते हे लिहिताना मंडाविया यांनी Father Of Nation ऐवजी Nation Of Father असं लिहिलं होतं.
-
अॅलोपथी आणि आयुर्वेद शास्त्रावरुन अनेक मतमतांतरे असली तरी मंडाविया हे आयुर्वेदाचे समर्थक आहेत.
-
इथेही त्यांनी भविष्य हा शब्द future ऐवजी fiture असा लिहिलाय.
-
मंडाविया यांच्या या वाक्याचा अर्थही अनेकांना कळला नसल्याच्या कमेंट सोशल नेटवर्किंगवर दिसून येत आहेत.
-
मंडावियांच्या या वाक्यामध्येही व्याकरणाचा गोंधळ असल्याचं दिसून येत आहे.
-
या वाक्यामध्ये अनेकांना Wrote You शब्द खटकलाय.
-
या वाक्यात ट्राय म्हणजे प्रयत्न करणे या अर्थाच्या शब्दाचं स्पेलिंगही चुकलं आहे.
-
Happy Independance Day ऐवजी मंडावियांनी Happy Indipedent Day असं लिहिलं होतं २०१३ साली.
-
होमिओपॅथीसंदर्भात मंडावियांचं मतही व्हायरल होतं आहे.
-
या ट्विटमध्येही व्याकरणाच्या अनेक चुका आहेत.
-
मंडावियांचं धार्मासंदर्भातील मतांचं हे ट्विटही व्हायरल होतं आहे.
-
अनेकांनी हे स्क्रीनशॉर्ट व्हायरल केले असले तरी भाजपा समर्थकांनी नव्या आरोग्यमंत्र्यांना ट्विटवरुन जज न करता त्यांच्या कामावरुन जज करावं असं म्हटलं आहे. (सर्व फोटो : एएनआय, आयएएनएस आणि ट्विटरवरुन साभार)
महात्मा गांधी Nation of Father, Happy Indipedent Day अन् बरंच काही…; नव्या आरोग्यमंत्र्यांची Tweets व्हायरल
करोना कालावधीमध्ये हर्ष वर्धन यांच्याकडून सुत्रं हाती घेण्याआधीच मंडाविया चर्चेत आहेत ते त्यांच्या जुन्या ट्विट्समुळे. त्यांनी शपथ घेताच जुने ट्विट व्हायरल
Web Title: Modi new cabinet new health minister mansukh mandaviya trolled over old tweets scsg