कोथरूड येथील बिंदू माधव ठाकरे रुग्णालयासमोर शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या पाण्याच्या टँकरखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शंतनू पुजारी (वय १९)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
शंतनू पुजारी हा त्याच्या मित्रा सोबत कॉलेज वरून पावणे तीनच्या सुमारास दुचाकी वरून घरी जात होता. बिंदू माधव ठाकरे रुग्णालयाच्या समोरील रस्त्यावरून जात असताना अचानक शंतनूची दुचाकी दुचाकी घसरली. याच दरम्यान तिथून महापालिकेच्या पाण्याने भरलेल्या टँकर जात होता. या टँकरच्या मागील चाकाखाली सापडून शंतनूचा गंभीर जखमी झाला. त्यानंतर शंतनूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. टँकर चालकाला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करण्यात येत आहे.
First published on: 27-01-2017 at 23:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 year youth died under water tanker in pune