सासू आणि मेहुण्यांच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर सांगवी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश लोखंडे असं आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव असून सासू श्रीमती दुर्गाबाई शिंदे, मेहुणा समाधान शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह साडू महेश लोखंडे आणि त्याचा मुलगा (नवरदेव) गणेश लोखंडे अशी आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी विनोद लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश यांची पत्नी छाया या चाकण येथे माहेरी राहतात. त्यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद होते, त्यांचं पटत नव्हतं. मयत सुरेश यांचा साडू आरोपी महेश लोखंडे यांचा मुलगा आरोपी गणेश लोखंडेचा लग्न सोहळा आज(दि.१९) रोजी होता. त्यामुळे सुरेशची पत्नी छाया, तीन मुलं, सासू आणि दोन मेहुणे हे गेल्या बुधवारी पिंपळे गुरव परिसरातील राहते घरी आले होते. तेव्हा, मयत सुरेश हा मुलांना भेटायला गेले असता पत्नीने भेटू दिले नाही. त्यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाला. तेवढ्यात सासू, साडू, मेहुणे आणि नवरदेव यांनी सुरेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर नवरदेवासह आरोपींनी सुरेशच्या घरी येऊन लग्न झाल्यानंतर बघून घेऊ अशी धमकी दिली होती असं फिर्यादीत म्हटलं आहे.

सुरेश तणावात आला होता, तो घाबरला होता यातूनच त्याने शनिवारी सकाळी पाऊणे आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून सासूला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तर, सर्व आरोपी फरार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news suicide case in pune