पुणे : जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. ग्यानबा तुकारामाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालताच पालखीचा इनामदार वाड्यात पहिला मुक्काम असेल. तिथं रात्री आरती, मग कीर्तन होईल. लाखोंच्या संख्येने देहूत वारकरी दाखल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगतगुरू संत तुकाराम महाजारांचा ३३९ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. ग्यानबा तुकाराम आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती. काल पासून देहूत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. इंद्रायणी तिरी वैष्णवांचा मेळा भरला होता.

आणखी वाचा-शर्यतीचा बैल खरेदीतील व्यवहारातून तरुणावर गोळीबार, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडेंच्या मुलांवर गुन्हा

सकाळी इनामदार वाड्यात जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. तिथून टाळ मृदंगच्या गजरात मुख्य मंदिरात पादुका आणण्यात आल्या. काही वेळातच अश्व आणि दिंड्याचे देऊळ वाड्यात आगमन झाले. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर ठीक पावणे तीनच्या सुमारास तुकोबांच्या पालखीने ग्यानबा तुकारामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून साध्या वेशात पोलीस पोलीस फिरत होते. चोरट्यांवर आणि संशयितांवर पोलोसांची नजर होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Departure of saint tukaram maharajs palanquin to pandharpur kjp 91 mrj