लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात असलेल्या श्री साईबाबा मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत दिलीप बहिरट (वय ५५, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात श्री साई सेवा प्रतिष्ठानचे मंदिर आहे.

श्री रामनवमीनिमित्त मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप चोरट्यांनी तोडले. चोरट्यांनी दानपेटी चोरुन नेली. दानपेटीत नेमकी किती रोकड होती, याबाबतची माहिती मिळाली नाही. पोलिसांकडून मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donation box stolen from a temple in narpatgiri chowk pune print news rbk 25 mrj