पुणे : दत्तवाडी भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार अड्ड्याच्या मालकासह १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तवाडी भागात एका पत्र्याच्या खोलीत जुगार, तसेच मटका अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कारवाईत जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाइल संच असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अड्डयाचा मालकासह जुगार खेळणाऱ्या १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, अजय राणे, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gambling place raid in duttawadi crime against 15 persons pune print news rbk 25 ysh