पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात बंडखोर शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदेच्या समर्थनात फलक लावण्यात आले आहेत. सोमवारी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आकुर्डीत पार पडली. शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर आज शहरात काही ठिकानी एकनाथ शिंदेच्या समर्थनात फलक लागलेले दिसत आहेत. यामागे नेमके शिवसैनिकच आहेत की भाजप अशी चर्चा आहे. पैकी, काही फलक फाडण्यात आले आहेत. शिवसेनेत उभी फूट पाडणारे शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेच्या समर्थनात पिंपरी-चिंचवड शहरात फ्लेक्स लागले आहेत. एकनाथ शिंदे साहेब समर्थक अस फलकावर नमूद असून हे फलक कोणी लावले याची जोरदार चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय दृष्ट्या भाजप ची मोठी ताकद आहे. महानगर पालिकेवर त्यांची सत्ता होती. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे वगळता शहरात मोठी व्यक्ती कोणी नाही. काल सोमवारी आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची बैठक पार पडली. सर्वच शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. परंतु, आज शहरात काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या समर्थनात लागलेले फलक कोणी लावले असा प्रश्न उपस्थित होत होतोय, शिवसैनिक किंवा भाजप ने फलक लावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2022 रोजी प्रकाशित
पिंपरी-चिंचवडमध्ये बंडखोर एकनाथ शिंदेच्या समर्थनात लागले फलक ; भाजप की शिवसेनेने लावले फलक?; स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा
आज शहरात काही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या समर्थनात लागलेले फलक कोणी लावले असा प्रश्न उपस्थित होत होतोय,
Written by लोकसत्ता टीम
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-06-2022 at 14:07 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hoarding put up in support of rebel shiv sena leader eknath shinde in pimpri chinchwad zws