पुणे : सध्या राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे २३ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरात घट

सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवेल. राज्यात २३ नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.

राज्यात रविवारी सर्वांत कमी १४ अंश सेल्सिअस तापमान जळगावात नोंदवले गेले, तर रत्नागिरीत सर्वाधिक ३५.६ अंश सेल्सिअस तापमान होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predicts maharashtra minmum temperature drop in next three days pune print news dbj 20 zws