पिंपरी : गल्लीत का बसलात, असे म्हणत तीन जणांच्या टोळक्याने कोयत्याने तरुणावर वार केले. त्यानंतर कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना जवळकरनगर, पिंपळेगुरव येथे घडली.तन्मय अविनाश कांबळे (वय १८), तथागत उर्फ आयुष महेंद्र कोले (वय २०, दोघे रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अभी सुरवसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय दत्तू कळसकर (वय २६, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय हे त्यांच्या मित्रांसोबत घराजवळ गप्पा मारत थांबले होते.  तिथे आरोपी आले. तन्मय आणि तथागत यांनी अक्षय यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. अभी याने कोयत्याने अक्षय यांच्यावर वार केले. यात अक्षय यांचा जीव जाईल याची कल्पना असताना देखील आरोपींनी हा हल्ला केला. त्यानंतर आरडाओरडा करीत कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyata gang is active again in pimpri chinchwad pune print news ggy 03 amy