पुणे : देशात चीनच्या आर्थिक, परराष्ट्र, व्यापार आणि संरक्षणविषयक धोरणांचे विश्लेषण करू शकतील, अशा तज्ज्ञांची कमतरता आहे. त्यामुळे चीनविषयक विश्वासार्ह माहिती आपल्याला मिळत नाही. चीनच्या धोरणांचे योग्य विश्लेषण होत नाही,’ अशी खंत माजी परराष्ट्र सचिव श्याम सरण यांनी व्यक्त केली.श्याम सरणलिखित ‘हाऊ चायना सीज इंडिया ॲण्ड द वर्ल्ड’ या पुस्तकावर पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चर्चासत्रात सरण यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले सहभागी झाले होते. चर्चासत्राचे अध्यक्ष सेंटरचे संचालक अमित परांजपे होते.
शाम सरण म्हणाले, ‘आपल्याकडे चीनच्या धोरणांचे विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांची मोठी कमतरता आहे. चीन स्वत:ला जागतिक राजकारण, अर्थकारणाचा केंद्रबिंदू समजतो. मात्र, आज तरी असे चित्र नाही. युरोप, अमेरिकेने ४०० ते ५०० वर्षे अविरत काम करून हे स्थान मिळविले आहे. चीनला हे स्थान ३०-३० वर्षांत मिळविता येणार नाही.

पुणे : ढोल ताशा पथकांच्या स्थिर वादनामुळे उत्सवात वाहतूक कोंडी

चीनमधील हुकूमशाही, चीनमधील तरुणांची संख्या आणि त्यांचे विचार आणि खासगी क्षेत्राचे अर्थकारणात वाढते योगदान पाहता चिनी राजकर्त्यांना चीनमध्ये हुकूमशाहीने कारभार करताना मर्यादा येत आहेत. चिनी लोकांची जीवनशैली वेगळी असल्यामुळे चीन जगाच्या अन्य देशांशी सहजपणे जुळवून घेऊ शकत नाही. चीनच्या ‘बेल्ट आणि रोड एनिशिएटीव्ह’ला युरोप, मध्य आशियात बऱ्यापैकी यश मिळाले आहे, तितके यश दक्षिण आशियात मिळालेले नाही. या साखळीतील श्रीलंका हा महत्त्वाचा दुवा आता फारच कुमकुवत झाला आहे.’

पुणे : पीएच.डी. प्रवेशासाठी परीक्षा वेळापत्रकाची प्रतीक्षा

भारताच्या विविधतेविषयी चीनला आकास

भारतात धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक विविधता असूनही भारत एकसंध कसा आहे, असा प्रश्न चिनी विचारवंताना कायम पडतो. विविधता असूनही भारत वेगाने विकास कसा करू शकतो, या बाबत चिनी तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करतात. मात्र, भारताची हीच विविधता देशाची, लोकशाहीच्या यशाची आणि आर्थिक विकासामागील खरी ताकद आहे. ती आपण जपली पाहिजे. भारत आक्रमक नाही, असे आपण म्हणतो. पण, चौल, पंड्या राजघराण्यांचा इतिहास पाहिल्यास आपण किती आक्रमक होतो आणि आपल्या सत्तेचा किती दूरवर विस्तार केला होता. हे दिसून येते. आक्रमकपणे धोरणे राबविण्यासाठी विविध प्रकारची सक्षमता लागते, असेही सरण म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of china experts in the country regret of former foreign secretary shyam saran pune print news tmb 01