पिंपरी: सुधारित आराखड्याच्या कामाला गती द्यावी ; खासदार बारणे यांची आयुक्तांना सूचना | MP Barne suggestion to the Commissioner to speed up the work on the revised plan pune print news amy 95 | Loksatta

पिंपरी: सुधारित आराखड्याच्या कामाला गती द्यावी ; खासदार बारणे यांची आयुक्तांना सूचना

पिंपरी-चिंचवड शहराचा आगामी २० वर्षांत होणारा विकास, लोकसंख्यावाढ, नागरीकरणाच्या गरजा लक्षात घेऊन सुधारित विकास आराखडा तयार केला जात आहे.

पिंपरी: सुधारित आराखड्याच्या कामाला गती द्यावी ; खासदार बारणे यांची आयुक्तांना सूचना
खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी-चिंचवड शहराचा आगामी २० वर्षांत होणारा विकास, लोकसंख्यावाढ, नागरीकरणाच्या गरजा लक्षात घेऊन सुधारित विकास आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्याचे काम वेगात पूर्ण करून मान्यतेसाठी तो राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली. राज्य सरकारशी संबंधित असलेले प्रस्ताव तातडीने पाठवावेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते निकाली काढू, अशी ग्वाही बारणे यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त

खासदार बारणे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या बैठकीसंदर्भात बारणे म्हणाले,की पूर्णत्वाकडे आलेली कामे जनतेसाठी खुली करावीत. स्मार्ट सिटीतील प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावावीत. सायन्स पार्कच्या विस्तारित कामाला गती द्यावी. पवना नदी सुधारच्या कामाला सुरुवात करावी. केजूबाई बंधारा ते मोरया गोसावी मंदिरापर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील भागाचे काम तत्काळ सुरू करावे, अशा सूचना आयुक्तांना केल्या आहेत.
ताथवडे येथे रुग्णालय, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आरक्षण आहे. ते ताब्यात घेण्यासाठीचा सुधारित प्रस्ताव पालिकेकडून राज्य शासनाला पाठवावा. प्राधिकरणातील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करावे. पुनर्वसन झालेल्या जागी पुन्हा झोपडपट्टी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी.

हेही वाचा >>> पुणे : सदनिकांच्या विक्री करारनाम्यांच्या नोंदी आता सुलभ ; दोन वर्षांत सात हजार सदनिकांची नोंद

‘रुबी एल केअर’ची चौकशी करा
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुबी एल केअरच्या माध्यमातून सिटी स्कॅनसह इतर उपचार केले जातात. नवीन थेरगाव रुग्णालयात परवानगी नसताना अशा उपचार सुविधा या कंपनीने सुरू केल्या आहेत. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरुन नागरिकांकडून जास्तीची बिले आकारली जात आहेत. चुकीच्या पद्धतीने कामकाज करणाऱ्या रूबी एल केअरची चौकशी करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी आयुक्तांना केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पिंपरीत अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल; वाघ यांच्याकडे प्रशासन, जगताप यांच्याकडे सुरक्षा

संबंधित बातम्या

व्यसन करू नकोस म्हटल्याने राग अनावर, नऊ जणांनी केला तरुणाचा खून
पुणे : पुरंदर विमानतळाचे काम ठप्पच; नव्या सरकारकडूनही प्रकल्पाबाबत हालचाली नाहीत
पुणे शहराचं विभाजन करण्याची आवश्यकता; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं ‘हे’ कारण
पुणे: मारहाण प्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता
पुणे:‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून तरुणींशी मैत्रीचे आमिष ; ज्येष्ठ नागरिकाला १७ लाखांचा गंडा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर