दिल्लीतून २९ किलो सोने घेऊन पसार झालेल्या चोरट्यास चिंचवड येथून अटक करण्यात आली. अनुज विनोदकुमार गुप्ता (रिंकू अगरवाल) (वय ३७, रा. बायस गल्ली, मेन बाजार, बहादूरगड, जि. झझर, हरियाणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून दिल्ली पोलीस व पिंपरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने त्याला चिंचवड येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले.
अनुज गुप्ता याने दिल्लीतील अनकुलदास नरेंद्रनाथदास यांच्या घरातील व इतर नऊ ज्वेलर्स दुकानातील सुमारे २९ किलो सोने लंपास केले होते. याप्रकरणी दिल्ली पोलीस गुप्ताचा शोध घेत असताना तो चिंचवड येथील एका लॉजमध्ये असल्याचे त्यांना कळले. यावरून दिल्ली पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या मदतीने चिंचवड येथील कामाक्षी हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासोबत पत्नी व दोन मुलेही होते. त्याने हॉटेलची रूम पत्नीच्या नावे बुक केली होती.
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे रोख दोन लाख रूपये सापडले. तीन ते चार किलो सोने त्याने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One thieves arrested in chinchwad who theft gold from delhi