पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) मुळशी तालुक्यातील जांबे गावातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. मुळशी तालुक्यातील मौजे जांबे येथील गट क्रमांक ८९ पै. आणि ८४ पै. या ठिकाणी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून तळमजला आणि एक मजला असे ५७०० चौरस फुटांचे आणि वाणिज्य स्वरूपाचे सुमारे ४०५० चौरस फूटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : ग्राहकांना फुकट सूप देण्याची योजना सुरू केल्याने उपाहारगृहचालकावर कोयत्याने वार

हे अनधिकृत बांधकाम तीन पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आले. ही कारवाई करताना पीएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संबंधित अनधिकृत बांधकामधारकांकडून बांधकाम पाडकामाचा खर्च वसूल केला जाणार आहे. दरम्यान, पीएमआरडीए क्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. परवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करू नये, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmrda demolish unauthorised construction in jambe village of mulshi pune print news psg 17 zws