व्यावसायिक स्पर्धेतून वाद; दोघांविरूद्ध गुन्हा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका उपहारगृहचालकाने फुकट सूप देण्याची योजना सुरू केली. ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने एका उपहारगृहचालकावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना खडकी भागात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून उपहारगृहाचालकावर हल्ला करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

हेही वाचा >>> चिंचवडमध्ये ‘आप’च्या उमेदवारासह सात उमेदवारांचे अर्ज बाद; ३३ उमेदवार वैध ; शुक्रवारपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत

मुलायम रामकृपाल पाल (वय २७, रा.दुर्गा माता मंदिराजवळ, मिलिटरी डेअरी फार्म, खडकी) असे जखमी झालेल्या उपहारगृहचालकाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थ भालेराव, दिग्विजय गजरे (दोघे रा. खडकी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाल यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाल यांचे खडकी बाजार परिसरातील चौपाटीजवळ ‘ओ शेठ’ हाॅटेल आहे. त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फुकट सूप योजना सुरू केली. खडकीतील चौपाटी परिसरात आरोपी भालेराव आणि गजरे खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावतात. पाल यांनी ग्राहकांना फुकट सूप देण्यास सुरुवात केल्यानंतर प्रतिसाद वाढला. ग्राहकांच्या प्रतिसाद वाढल्याने पाल यांच्यावर आरोपी चिडून होते. वादातून आरोपी भालेराव आणि गजरे यांनी पाल यांच्यावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून खडकी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
bmc employees removed artificial lights on trees
प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग