कोरेगाव पार्क परिसरातील लोणकर वस्तीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. हर्षद बिश्वास (वय २४, रा. कोलकाता) असे मृत्यमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
याबाबत पोलिसांनी सांगितले की, लोणकर वस्तीत एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. हर्षद हा सातव्या मजल्यावरुन खाली पडला. पाचव्या मजल्यावर जाळी लावली होती. त्यात त्याचे हेल्मेट पडले. पाठोपाठ तो पडल्याने जाळी तुटून तो खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. मुंढवा पोलीस तपास करत आहेत.
First published on: 30-06-2022 at 13:46 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune a worker died after falling from the seventh floor pune print news msr