शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला मुसळधार पाऊस सलग पाचव्या दिवशी कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत चारही धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ८१ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ५५ मि.मी, पानशेत धरण परिसरात ६० मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ५.४५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १८.६८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवारी रात्री चारही धरणांत ४.९३ टीएमसी पाणीसाठा होता. गुरुवारी रात्रीच्या तुलनेत शुक्रवारी सकाळी ०.५२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune heavy rains in dam area for fifth day in a row pune print news msr