पुण्यात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांना तब्बल ८१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे शहरात १ जानेवारी २०१९ पासून न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. या वर्षभरात १६ लाख दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना तब्बल ८१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे आजवर सर्वाधिक दंड पोलिसांकडून ठोठावण्यात आल्याचे बोललेले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायालयाच्या आदेशानुसार १ जानेवारीपासून पुणे शहरात जे दुचाकीचालक हेल्मेट वापरत नाहीत अशा चालकांना वाहतूक पोलिसांनी दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईच्या विरोधात शहरातील अनेक संघटनाकडून वर्षभर आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला होता. मात्र तरीदेखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू ठेवण्यात आली होती.

या वर्षभरात १६ लाख २० हजार दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली असून ८१ कोटी ८९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र त्यापैकी २१ कोटींचा दंड वसूल करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलं आहे. तर अजून ६० कोटी ८९ लाख रुपयांचा दंड थकीत राहिला आहे. तसंच ज्या दुचाकी चालकांनी अद्यापपर्यंत दंड भरला नाही अशा चालकांकडून वाहतूक पोलिस शहरातील ठिकठिकाणी नाकाबंदीच्या माध्यमातून दंड वसूल करत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune traffic police fine 81 crore to bikers driving without helmet sgy