Tourist Death : तोरणा या गडावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शनिवारी म्हणजेच ८ फेब्रुवारीला ही घटना घडली. रणजीत मोहनदास शिंदे असं या पर्यटकाचं नाव आहे. हा पर्यटक मूळचा सातारा जिल्ह्यातील सोनगावचा रहिवासी होता. तसंच तो सध्या पुण्यातील वारजे या ठिकाणी राहात होता. फजीलत खान आणि रणजीत शिंदे असे दोघेजण तोरणा गडावर गेले होते. या प्रकरणी फजीलत खानने पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद केली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर धिवार हे पुढील तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजीतने तोरणा किल्ला गिर्यारोहणास सुरुवात करुन काही वेळ झाला होता. त्यावेळी त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. फजीलत खान आणि रणजीत दोघंही बरोबर ट्रेकला गेले होते. मात्र रणजीतला छातीत दुखू लागलं आणि तो बेशुद्ध झाला. ज्यानंतर फजीलत खानने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी ११२ या हेल्पलाइनवर संपर्क साधला.रणजीत आणि फजीलत या दोघांनी ८ फेब्रुवारीच्या रात्री ११ च्या दरम्यान तोरणा किल्ल्यावर जाण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ते विशिष्ट अंतरावर पोहचले तेव्हा रणजीतला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर फजीलतने संपर्क करुन पोलीस आणि रुग्णवाहिका बोलवली. त्यानंतर रणजीतला गडाच्या खाली नेण्यात आलं अशीही माहिती आता समोर आली आहे.

पोलिसांनी आणखी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजीतला खाली आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थान पथकाशी त्यांनी संपर्क साधला. तसंच या ठिकाणी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रोहीत मरभळ, युवराज सोमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोलस्कर, अनिल रेणुसे हे गडावर पोहचले. त्यांनी बेशुद्ध रणजीत शिंदेला खाली आणलं. त्याची तपासणी करण्याची सगळी व्यवस्था करण्यात आली होती.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध रणजीतला खाली आणलं गेलं

रणजीतला खाली आणेपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते. त्यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका थांबली होती. डॉ. राहुल बोरसे, चंद्रकांत भोईटे आणि ज्ञानेश्वर हिरास यांनी शिंदेला मृत घोषित केलं. रणजीत शिंदे हे वारजे परिसरात दुधाचा व्यवसाय करत होते. या प्रकरणात आता ज्ञानेश्वर धिवरे हे पुढील तपास करत आहेत. पुणे मिररने हे वृत्त दिलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist death at torna fort due heart attack pune tourist ranjit shinde died scj