पुण्यातील महिला पोलीस अधिकारी पत्नीला सर्विस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार पतीविरोधात खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस फौजदार हरीश ठाकूर (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार, बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये सहायक पोलीस फौजदार म्हणून आरोपी हरीश ठाकूर नेमणुकीस आहे. त्या अधिकाऱ्याने पहिल्या पत्नी सोबत घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी ७ वर्षापुर्वी लग्न केले. तेव्हापासून तो पीडित महिलेला शारीरिक, मानसिक त्रास देत राहिला. तर तक्रारदार महिलेच्या पाच वर्षाच्या मुलासमोर अनेक वेळा पीडित महिलेशी अनैसर्गिक अत्याचार केला आहे.

त्याच दरम्यान २०१५ मध्ये मुंबईतील घरी पीडित महिलेवर आरोपी पतीने सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी देखील झाडली. त्यामध्ये त्या जखमी झाल्या होत्या. दरम्यान, पीडित महिलेने आरोपी हरीश ठाकूरच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे खडकी पोलिसांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife abused by police officer attempt to kill srk 94 svk