नाश्ता हा आपल्या दिवसभरातील आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. असे म्हणतात की, नाश्ता हा पोटभर करावा जेणेकरून दिवसभर धावपळ करण्यासाठी ऊर्जा शरीरात राहते. नाश्तामध्ये आपल्याकडे सहसा शिरा, पोहे, उपीट किंवा शेवयांचा उपमा असे पदार्थ असतात जे झटपट तयार होतात. इडली, वडा सांबार, इडली चटणी, डोसा, सँडविच हे पदार्थ तयार करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे सुट्टीच्या दिवशीच असे पदार्थ बनवले जातात. तुम्हाला जर रोजचे शिरा-पोहे-उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक झटपट तयार होणारी एक सोपी रेसिपी आहे. तुम्ही पोहे आणि कच्चा बटाटा वापरून हा त्याचा चविष्ट पराठा तयार करू शकता. चला मग जाणून घेऊ या खमंग पोह्याचा पराठा कसा बनवायचा ते….

पोहे व कच्च्या बटाट्याचा खमंग खरपूस नाश्ता पोह्याचा टेस्टी पराठा

साहित्य:

  • पोहे २ वाटी (१२५ ग्राम )
  • ओवा १/२ टी स्पून
  • धने जिरेपूड१ टी स्पून
  • चिली फ्लेक्स १/२ टी स्पून
  • हळद १/४ टी स्पून
  • गरम मसाला १/४ टी स्पून
  • मीठ
  • कच्चा बटाटा ५ ( २५० ग्राम )
  • हिरवी मिरची ३
  • लसूण पाकळ्या ७-८
  • आलं १/२ इंच
  • कोथिंबीर

हेही वाचा – दगडी खलबत्यामध्ये झटपट बनवा पापडाची चटणी! चव एकदम भन्नाट, एकदा खाऊन तर बघा

कृती

  • प्रथम कांदेपोह्यांसाठी वापरले जाणारे २ वाटी पोहे मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्या.
  • आता त्यात ओवा, धने, जिरेपूड, चिली फ्रेलक्स, हळद, गरम मसाला आणि मिठ घालून एकत्र करा.
  • कच्च्या बटाट्याची साल काढून त्याचे काप करून मिक्सरमध्ये तुकडे करून टाका.
  • बटाटा मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि पोह्याच्या पिठात टाका आणि बारीक चिरलेली कोथिंबरी एकत्र करा.
  • आता हे पिठ मळून घ्या. गरज असेल तर थोडे पाणी घालून मळावे.
  • एक चमचा तेल घालून एकजीव करून घ्या आणि १५ मिनिटे झाकून घ्या.
  • आता तयार पिठाचे गोळे करून गोलाकार पराठे लाटा. गव्हाचे थोडेसे पीठ घेऊ लाटू शकता.
  • तुम्हाला गोलाकार आकार हवा असेल तर डब्याच्या झाकणाने आकार कापून घ्या
  • गरम तव्यावर तेल किंवा तूप लावून व्यवस्थित भाजून घ्या.
  • दह, लोणचे, सॉस, चटणीरोबर हे पराठे अत्यंत स्वादिष्ट लागतात.

हेही वाचा – Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला बनवा बदाम पोळी; सोपी रेसिपी लगेच नोट करा

हेही वाचा – बाप्पासाठी नैवेद्य काय दाखवायचा? तुम्हालाही हा प्रश्न असेल तर, जाणून घ्या बाप्पाचे आवडते १० पदार्थ

टीप – तुम्ही कच्च्या बटाट्याऐवजी शिजवलेला बटाटा वापरू शकता पण त्यामुळे पराठे मऊ होतील आणि चवही वेगळी लागेल.
पातळ लाटल्यास पराठे छान फुगतात.