Egg Bhurji Rice Recipe In Marathi: बिर्याणी, पुलाव असे पदार्थ आपण नेहमीच खात असतो. भूक लागल्यावर बरेचसे लोक झटपट अंड्याची भुर्जी बनवून खातात. भुर्जीचा आणखी एक प्रकार आपल्याकडे प्रसिद्ध आहे. या पदार्थाचे नाव आहे ‘अंडा भुर्जी पुलाव’. हा पुलाव इतर पुलावांपेक्षा काहीसा वेगळा आहे. नावाप्रमाणे यामध्ये अंडी फेटून त्याची भुर्जी बनवून टाकली जाते. जर तुमच्या घरी भात आणि अंडी असतील आणि तुम्हाला खूप भूक लागली असूनही चमचमीत पदार्थ खायचा असेल, तर तुम्ही अंडा भुर्जी पुलाव बनवू शकता. ऑफिसला किंवा बाहेर जाताना टिफीनमध्येही हा पदार्थ नेऊ शकता. भात, अंडी आणि काही मसाले अशा थोडक्या सामग्रीमध्ये हा पुलाव तयार होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य –

  • २ अंडी
  • शिजलेला भात
  • बारीक चिरलेला कांदा
  • लसूण आलं पेस्ट
  • गाजर
  • मटार
  • फ्लॉवर
  • फरसबी
  • मीठ व खडा मसाला
  • तमालपत्र, दालचिनी
  • दही २ चमचे

कृती –

  • भात मोकळा शिजवून घ्या. शिजवताना त्यामध्ये मीठ तमालपत्र, दालचिनी व मिऱ्या घाला.
  • कढईत तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो व भाज्या परतून घ्या.
  • त्यात थोडा गरम मसाला घाला. बाजूला काढून ठेवा.
  • त्याच कढईत फेटलेली अंडी घाला व भराभर हलवा, भुर्जी तयार होईल.
  • त्यात भाज्यांचा मसाला घालून परतून घ्या.
  • जाड बुडाच्या भांड्यात भात व भुर्जी एकत्र करून नीट हलवून घ्या व वाफ काढा.
  • झाला अंडा भुर्जी पुलाव तयार…

आणखी वाचा – संध्याकाळच्या नाश्ताला बनवा फक्त दहा मिनिटांमध्ये होणारा ‘किटो पिझ्झा’, पटकन नोट करा सोपी रेसिपी

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Egg bhurji rice recipe in marathi how to make anda bhurji pulao at home try delicious dish at home know more yps