खूप वर्षानंतर चंद्रग्रहणाच्या काळात शनीची वक्री अवस्था! ‘या’ ३ राशींना होणार मोठा फायदा
Chandra Grahan Shani Vakri: ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी पितृ पक्षाच्या सुरुवातीलाच चंद्रग्रहण होणार आहे. त्या दिवशी शनी देव वक्री असतील. अशा वेळी पाहू या, चंद्रग्रहणावर शनी वक्री असणे कोणत्या ३ राशींसाठी शुभ आणि मंगलकारी ठरणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी पितृ पक्षाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होत आहे. खास गोष्ट म्हणजे ह्याच दिवशी शनी देव वक्री अवस्थेत गोचर करतील. असा दुर्मिळ योग अनेक वर्षांनंतर तयार होत आहे, जेव्हा पितृ पक्षात शनी देव वक्री म्हणजेच उलटी चाल सुरू करतील.