गणेश चतुर्थीला अद्भुत महासंयोग! बाप्पाच्या कृपेने ‘या’ ३ राशीचे लोक होतील कोट्यधीश…
Ganesh Chaturthi Shubh Yog: दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो. हा उत्सव देशभर भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्ट, बुधवारपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. यावेळी खूप शुभ योग तयार होत आहेत, जे अनेक वर्षांनी बनत आहेत. गणेश चतुर्थी बुधवारी असल्याने अनेक राजयोग होत आहेत. या दिवशी नवपंचम राजयोग, रवियोग, लक्ष्मी नारायण योग, धनयोग, आदित्य योग, राशी परिवर्तन योग, महालक्ष्मी योग आणि गजकेसरी राजयोग तयार होत आहेत.