९ ऑगस्टला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक पैसा! मंगळ आणि शनीच्या युतीमुळे होईल आर्थिक लाभ
Pratiyuti Yog on 9 August: ज्योतिष शास्त्रात मंगळ आणि शनी यांचा एकत्र येणारा योग खूप प्रभावशाली मानला जातो. हा योग काही राशींकरता खास फायदेशीर ठरू शकतो. ज्योतिषीय गणनेनुसार, ९ ऑगस्टला शनी आणि मंगळ एकमेकांपासून १८० अंशांवर असतील. त्यामुळे त्यांच्या दरम्यान प्रतियुती योग तयार होईल. हा शक्तिशाली योग ५ राशींसाठी खूपच शुभ ठरेल.