३० वर्षांनंतर ‘या’ राशींच्या आयुष्यात श्रीमंती! शनी-शुक्राचा समसप्तक योग देणार भरपूर पैसा
Samsaptak Yog: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह वेळोवेळी राजयोग आणि शुभ योग तयार करतात. याचा मोठा परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि जगावर दिसून येतो. शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी वैदिक ज्योतिषातील दोन महत्त्वाचे ग्रह समसप्तक योग तयार करत आहेत. हे दोन ग्रह म्हणजे शुक्र आणि शनी. या योगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. तसेच मन आनंदी राहील. चला तर मग पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…