‘चुनरी चुनरी’ गाण्याच्या रिमेकवर मूळ गायकाची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाले…
गेल्या काही वर्षांत हिंदी गाण्यांचे रिमेक करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशातच सलमान खानच्या 'बिवी नंबर १' चित्रपटातील 'चुनरी चुनरी' गाण्याचा रिमेक वरुण धवनच्या आगामी 'जवानी तो इश्क होना है' चित्रपटात आहे. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या गाण्याच्या रिमेकबद्दल मूळ गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत रिमेकमुळे मूळ गाण्याचे महत्त्व कमी होत नसल्याचे सांगितले.