अजय देवगणमुळे को-स्टारच्या बायकोने खालेल्या झोपेच्या गोळ्या, दवाखान्यात केलेलं दाखल
अजय देवगणला गंभीर वाटत असलं तरी त्याचे प्रँक प्रसिद्ध आहेत. त्याने करीना कपूर, परिणीती चोप्रावर प्रँक केले आहेत. एकदा त्याच्या प्रँकमुळे एका सह-अभिनेत्याच्या पत्नीने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. अजयने तिला तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले होते. रोहित शेट्टीसह अजयने करीनालाही भूतांच्या गोष्टी सांगून घाबरवलं होतं. एकदा त्याने करीनावर नकली बॉम्ब फेकला होता.