“मी दहशतवादाचा बळी”, अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले, “२६/११ घडले तेव्हा…”
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर सक्रिय असून, समाजातील विविध घडामोडींवर मुक्तपणे व्यक्त होतात. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याबद्दल त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी दहशतवादाचा बळी असल्याचे सांगितले. तसंच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आणि भारतीय सशस्त्र दलांचे हल्ल्याबद्दल अभिनंदन केले.