लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलांचा पहिल्यांदाच बिझनेस क्लासमधून प्रवास; केलेला ‘हा’ नियम
अभिनेत्री अर्चना पूरन सिंह, जी कपिल शर्माच्या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसते, तिने तिच्या कुटुंबासोबत स्वित्झर्लंड ट्रीपची झलक युट्यूब व्लॉगद्वारे शेअर केली आहे. अर्चना आणि तिचा पती परमीत सेठी यांनी त्यांच्या मुलांसाठी एक नियम बनवला होता की, ते स्वतःचे विमान प्रवासाचे तिकीट खरेदी करेपर्यंत बिझनेस क्लासमधून प्रवास करू शकणार नाहीत. त्यांच्या मुलांनी पहिल्यांदाच बिझनेस क्लासमधून प्रवास केला आणि अर्चनाने त्यांचे कौतुक केले.