Jolly LLB 2 मध्ये अर्शद वारसी का नव्हता? रिप्लेसमेंटबद्दल अभिनेत्याने केला खुलासा
'जॉली एलएलबी ३'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अर्शद वारसीने मजेशीर पद्धतीने सांगितले की, पहिल्या चित्रपटानंतर त्याला काढण्यात आलं आणि त्यासाठी दिग्दर्शक सुभाष कपूर जबाबदार होते. अक्षय कुमारने स्क्रिप्टबाबत दिग्दर्शकाच्या कडक शिस्तीबद्दल सांगितलं. अर्शदने अक्षयबरोबरच्या कामाचा अनुभव शेअर केला. 'जॉली एलएलबी ३'मध्ये अक्षय आणि अर्शद वकिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. १९ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.