“सलमान खान अजिबात फिट नाही, VFX वापरून…”, ‘दबंग’च्या दिग्दर्शकाकडून अभिनेत्याची पोलखोल
'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान खानच्या फिटनेसवर टीका केली आहे. 'बॉलिवूड ठिकाणा' या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनवने सलमान VFX द्वारे स्वत:ची शरीरयष्टी सुदृढ दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. तसेच, स्टंट सीनसाठी बॉडी डबल वापरल्याचंही सांगितलं. अभिनवच्या या नव्या आरोपांमुळे सलमान आणि त्यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आले आहेत.