अरबाजबरोबरच्या नात्यावर मलायकाची प्रतिक्रिया; म्हणाली,”लग्न टिकावं अशी इच्छा होती पण…”
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने २५ व्या वर्षी अभिनेता अरबाज खानबरोबर लग्न केले, परंतु १९ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. पिंकव्हिलाशी संवादात मलायका म्हणाली की, तिचं लग्न टिकावं अशी तिची इच्छा होती, पण नात्यात सुधारणा न झाल्याने तिने घटस्फोट घेतला. तिने स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सांगितलं आणि आज ती अधिक समजूतदार आणि आनंदी असल्याचं व्यक्त केलं.