“अजूनही संघर्ष करतोय…”, नवाजुद्दीन सिद्दीकीचं वक्तव्य; म्हणाला, “मी १२-१५ वर्षे…”
नवाजुद्दीन सिद्दीकीने १९९९ मध्ये 'सरफरोश' चित्रपटातून पदार्पण केलं, पण त्याला खरा ब्रेक २०१२ साली 'गँग्स ऑफ वासेपूर पार्ट -२' मधून मिळाला. त्याने १२-१५ वर्षे संघर्ष केल्याचं सांगितलं आहे. 'मैं ॲक्टर नही हू' चित्रपटात नवाजुद्दीनने संघर्ष करणाऱ्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य कृपलानी यांनी केलं असून, मार्च २०२५ ला कॅलिफोर्नियामध्ये प्रीमियर झाला होता.