भारताची सून आहे पाकिस्तानी अभिनेत्री, बॉलीवूड चित्रपट करताना पडलेली इंटर्नच्या प्रेमात
पाकिस्तानी अभिनेत्री मदिहा इमामने २०२३ मध्ये भारतीय चित्रपट निर्माता मोजी बसर याच्याशी लग्न केलं. मोजी अरुणाचल प्रदेशचा असून 'द सिक' चित्रपटासाठी ओळखला जातो. मदिहाने 'डियर माया' या बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे. तिच्या अनेक पाकिस्तानी मालिका गाजल्या आहेत. मदिहा आणि मोजीची भेट भारतात चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यांच्या आंतरराष्ट्रीय लग्नामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.