“अभिनंदन बायको…”, रितेश देशमुखची खास पोस्ट; जिनिलीया व मुलांबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…
रितेश देशमुखने सोशल मीडियावर पत्नी जिनिलीयासाठी खास पोस्ट केली आहे. त्याने त्यांच्या दोन मुलांसह एक फोटो शेअर करून जिनिलीयाच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे कौतुक केले. हा चित्रपट २० जून रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रितेश व जिनिलीया हे दोघेही आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.