“हीसुद्धा इतर काही अभिनेत्रींसारखीच…”, ‘त्या’ फोटोमुळे साई पल्लवी ट्रोलर्सच्या निशाण्यावर
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आपल्या साध्या आणि पारंपरिक लूकसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिच्या बहिणीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे ती ट्रोल झाली आहे. या फोटोंमध्ये साई पल्लवी समुद्रकिनारी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. काहींनी तिच्यावर टीका केली असली तरी तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेतली आहे. साई पल्लवीने पूर्वीही स्लीव्हलेस कपडे परिधान केले आहेत आणि तिला काय घालावे हे ठरवण्याचा अधिकार तिचा आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.