संजय कपूर यांचा शेवटचा फोटो आला समोर, पोलोचा सामना जिंकले, पण जीव गेला
अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती आणि उद्योजक संजय कपूर यांचे १२ जून रोजी लंडनमध्ये निधन झाले. पोलो मॅच खेळताना त्यांनी चुकून मधमाशी गिळली, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पोलो टीमने शेवटचा फोटो शेअर केला. अंतिम सामना संजय यांच्या स्मृतीस समर्पित केला जाईल. संजय कपूर हे सोना कॉमस्टारचे चेअरमन होते आणि त्यांची संपत्ती १०,३०० कोटी रुपये होती.