ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल, ICU मध्ये उपचार सुरू; डॉक्टरांनी दिली माहिती
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास अडचण झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या डिस्चार्जबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. धर्मेंद्र लवकरच 'इक्कीस' चित्रपटात दिसणार आहेत.