ट्रम्प यांच्या टॅरिफवाढीचा फटका अमेरिकन ग्राहकांनाच अधिक बसणार, हे ‘ब्रँड’ किमती वाढवणार
डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर आयातशुल्क लादल्यामुळे स्पोर्ट्सवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आलिशान वस्तू आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ॲडिडास, नायकी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, हर्मीस, फुजीफिल्म, अमेझॉन आणि वॉलमार्ट या ब्रँड्सनी त्यांच्या वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत.